नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – लसुन भरलेल्या गोण्याच्या आडोशात बेकायदेशीरपणे अमली पदार्थ आफुची तस्करी करणाऱ्या पिकअप वाहनाला शिरपूर तालुका पोलीस पकडून त्यात १७ लाख ७६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर येथे तपासणी नाका उभारण्यात आला असून वाहनांची तपासणी करीत असताना शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मध्यप्रदेश राज्याकडून महाराष्ट्रात एका पिकअप वाहनातून बेकायदेशीरपणे अमली पदार्थाची (आफीम ) वाहतूक होणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक 29 रोजी पळासनेर तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करीत असताना मध्यप्रदेश राज्याकडून संशयित पिकअब वाहन क्र एम पी १३ जीबी ३५२५ येताना दिसले वाहन थांबवून चालकाला आपले नाव गाव विचारले तर त्याने आपले नाव कृपालसिंग उमेदसिंग राजपुरोहित वय ३५ रा गाव डोली ता पाचपदरी जि बारमेर राजस्थान सहचालक रघुनाथसिंग कचरूसिंग गुर्जर वय २१ रा आनेडाता सोहासरा जिल्हा मंसुर मध्यप्रदेश असे सांगितले. वाहनात काय भरले आहे याबाबत विचारपूस दिली असता त्यांनी वाहनात लसूणच्या गोण्या भरलेल्या आहे असे सांगितले पोलिसांना वाहनाचा अधिक संशय आल्याने वाहनातून लसूण भरलेल्या होण्या खाली उतरवून त्याखाली बघितले असता वाहनाच्या चोर कप्प्यात लपवून ठेवलेले ५ लाख ७६ हजार रुपये किमतीचे ७२ किलो वजनाचे बेकायदेशीरपणे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे अफूचे सुकलेले बोंड (डोडा ) ७ लाख रुपये किमतीचे २ किलो ग्राम वजनाचे आफिम ५ लाख रुपये किंमतीची पिकअब वाहन असा एकूण १७ लाख ,७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही चालकाविरुद्ध गु र् नं११०/ २०२४ गुंगीकारक औषध द्रव व मनोव्यापरावर विपरीत परिणाम करणारे अमली पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क ) १५ (अ) प्रमाणे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ असं ई रफिक मुल्ला पोहेका संदीप ठाकरे मंगेश मोरे चत्तरसिंग खसावत दिनेश सोनवणे शिवाजी वसावे कृष्णा पावरा वाला पुरोहित दिनकर पवार रोहिदास पावरा जयेश मोरे मनोज पाटील अल्ताफ मिर्झा यांनी केली आहे.