नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली सर्व शक्ती पणाला लावताना दिसत आहे. काहीनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत तर काही उमेदवारांच्या शोधात आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी विरोधकांना झटका देत पुण्यात प्रसिद्ध असलेले वसंत मोर यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उचवल्या आहेत.
या चर्चे नंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की वसंत मोरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, दुसरी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे.२-३ दिवसानंतर महाराष्ट्रातलं नव समीकरण समोर येईल. पण या चर्चे नंतर अनेकांच्या भुवया उचवल्या आहेत.
वंचित बरोबर झालेल्या चर्चे नंतर आपली प्रतिक्रिया देत वसंत मोर म्हणाले की पुणे लोकसभेची निवडणूक १००% लढणार आहे. मी माझं नशीब समजतो की, प्रकाश आंबेडकरांनी मला इथे बोलावलं आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली आमची सकारात्मक चर्चा झाली पुढचा मार्ग येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट करू. पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला खात्री आहे. असेही ते म्हणाले.
पत्रकारांनी वंचित मधील प्रवेशाबाबत वसंत मोर यांना प्रश्न विचारला असता याबाबतचा निर्णय हा प्रकाश आंबेडकर घेतील काही दिवसांत यावर भूमिका प्रकाश आंबेडकर स्पष्ट करतील अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.
नुकतेच मनसेतून लोकसभा उमेदवारी वरुण नाराज होत वसंत मोरे यांनी राजीनामा दिला होता. वसंत मोरे हे पुण्यामध्ये धडाडीचे कार्यकर्ते समजले जातात. त्यांच्या कामाच्या माध्यमातून पुण्यात वसंत मोर यांची जनसामन्यात मोठी छाप आहे. त्यातच वंचित कडून जर त्यांना उमेदवारी मिळाली तर विरोधकांना मोठे आव्हान असणार आहेत.