नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्व भागातील महापालिकेच्या प्रभाग कार्यालया शेजारी उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला आहे या पुतळ्याचे अनावरण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल सायंकाळी करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदार श्रीकांत शिंदे स्मारक समितीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले माझ्याकडे शब्द अपूर्ण आहेत कल्याणच्या जनतेचे स्वप्न या स्मारकाच्या निमित्ताने पूर्ण झाले आहे लोकांना जितका आनंद झाला आहे. त्याहीपेक्षा मला त्याचा आनंद झाला आहे. एका पुतळ्यापासून सुरू झालेली कथा एका स्मारकापर्यंत जाऊन पोहोचली.