नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नवी मुंबई नेरूळ येथे आयोजित सत्ता परिवर्तन महासभेत बाळासाहेब आंबेडकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले तर 2026ला देश कर्जात बुडेल अशी घणाघाती टीका ही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागा आणण्याचा निर्धार केला आहे. पण भाजपचे 400 आणायचे की नाही जनता ठरवणार असे म्हणत त्यांनी मतदारांना आवाहन केले की योग्य ठिकाणी मतदान करा लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला मतदान करू नका असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
पुढे मराठा आरक्षणा विषयी बोलतांना ते म्हणाले आरक्षण नाही,तर निराशा दिली म्हणून हे फसवणूक करणारे सरकार आहे असा टोलाही यावेळी त्यांनी सरकारला लगावला, आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही,मात्र धर्माच्या राजकारणाला विरोध आहे. धर्माच्या नावाने जे राजकारण चालवले आहे त्याला आमचा विरोध आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर त्यांनी हेही सांगितले यावेळी सेक्युलर पक्षांचे सरकार येणार.
सरकारी यंत्रणाच्या धाड सत्रावर भाष्य करताना ते म्हणाले सरकारी यंत्रनांनी जे काम करतात त्यांना आमचा विरोध नाही ते त्यांच काम आहे, पण ते योग्य पद्धतीने व खऱ्या पणाने राबविले पाहिजे. या विषयावर सरकारला धारेवर धरत त्यांनी इतर राज्यात किती कारवाया आणि गुजरात मध्ये किती कारवाया यादी द्या असा सवाल सुद्धा केला. चोर माणसं भाजप पक्षात घेतो आणि स्वच्छ करतो हीच मोदी गॅरंटी आहे का ? असा सवाल ही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नवी मुंबई नेरूळ येथे आयोजित सत्ता परिवर्तन महासभेत विविध पक्ष संघटनांच्या शेकडो नेत्यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अनेकांनी पक्ष प्रवेश केला. या वेळी सत्ता परिवर्तन महासभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे नेते मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षातून जगदीश घरत, नासिर रशिद शेख, पवन निखाडे, राहुल चव्हाण, अविनाश अडागळे, अमन मंगवना, दिनेश साळवे, जितेंद्र काबंळे, विनय मोरे, अबु बाखर नाखवा, अरबाज शेख, गणपत शेलार, सुशील मोरे आणि किरण ठाकरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. तसेच, मुस्लिम समाजातील नेते मोहम्मद फैजल शेख, शेख शहाबुद्दीन सिद्दीकी, नसिर खान, खालीद भाई यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला. खाटीक समाजाचे नेते शमसुद्दीन मोमीन, सर्वर खान तसेच, आदिवासी समाजाचे नेते ॲड. सुनील टोटावाड, संपत वळवी, लक्ष्मण मुठे, अमोल भालेकर या सर्व आदिवासी नेत्यांनीही वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला. याबरोबर मारवाडी समाज, मातंग समाजातील नेत्यांनीही पक्ष प्रवेश केला.
देशात सध्या हुकूमशाहीची राजवट आली आहे. ती बदलायची असेल तर सत्ता परिवर्तन करणे आवश्यक आहे. देशातील तरुण दिशाहीन झाला आहे. त्यामुळे परिवर्तन होणे गरजेचे आहे. तसेच, तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. ते मार्गदर्शन सध्या ॲड. प्रकाश आंबेडकरच करु शकतात असा विश्वास ॲड. सुनील टोटावाड यांनी व्यक्त केला.