महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
थोडक्यात महाराष्ट्र

मद्यधुंद एसटी चालकाने दिली महिलेला धडक, महिला गंभीर जखमी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

बुलढाणा/प्रतिनिधी – बस चालकाने दारूच्या नशेत बस चालवून एका महिलेला धडक दिल्याची घटना अकोला बायपास वर घडली आहे. ती महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाजगी बस ट्रॅव्हल्सचे वाहक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने यापूर्वी मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगाराची बस खामगाव येथून लोणारकडे जात असताना अकोला बायपास वर एक महिला रस्ता ओलांडण्यासाठी उभी होती. यावेळी समोरुन येणाऱ्या बसने त्या महिलेला धडक दिली. बसच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. तिला नागरिकांनी त्वरित उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती केले होते. उषा राजेंद्र बोराडे (वय 50) असे नाव आहे. तर घटनास्थळी बसमधील प्रवासी बस चालक व वाहक हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे अशा चालकाच्या हातात आगार प्रमुख स्टेअरिंग देत असतील तर अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार आहे. अपघात घडून अनेक निष्पाप लोकांचे बळी जाऊ शकतात. त्यामुळे अशा चालकांवर आगार काय कारवाई करतील? हे पाहावे लागणार आहे. याबाबत आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे यांना विचारणा केली असता चालक अंकुश राऊत व वाहक रंजित सपकाळ या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×