नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षानी निवडणुकीसाठी कंबर कसलेली दिसून येत आहे. त्यातच संपूर्ण देशात ईव्हीएम हटाव देश बचाव चा नारा देत भविष्यातील निवडणुका या बॅलेट पेपर घ्याव्यात अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. यासाठी नागरिक ठीक ठिकाणी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. प्रामाणिक पणे निवडणुका घ्यायच्या असतील तर बॅलेट पेपर वर घेण्यात याव्यात अशी मागणी संविधान प्रेमी नागरिकांनी केली आहे. या मागणी कडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक मध्ये संविधान प्रेमी नागरिकांचा महामोर्चा काढण्यात आला होता. त्यात मोठ्या संख्येने नागरिक सामील झाले होते.

ईव्हीएम विरोधात मोर्चा ईव्हीएम हटाव देश बचाव चा नारा देत संविधान सन्मान वकील समितीतर्फे ईव्हीएमची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी संविधान प्रेमींनी एकत्र येत ईव्हीएम हटाव विरोधात एकत्र येण्याचे जनतेला आवाहन केले. नाशिकच्या गोल्फ कल्ब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. देशातील भविष्यातील निवडणुका या बॅलेट पेपर घ्याव्या अशी जोरदार मागणी यावेळी लावून धरण्यात आली. डॉ. संजय अपरांती, माजी पोलीस अधीक्षक हेही या मोर्च्यात सामील झाले होते. संविधान वाचवायचे असेल तर ईव्हीएम हटवले पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली.