नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
सांगली/प्रतिनिधी – शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले कसलाही निर्णय झाला नसताना कांद्यावरील बंदी उठवली अशी अफवा पसरवून अनेक राजकीय नेत्यांनी आपली पाठ थोपटून घेतली. आपणच कांद्याचा पाठपुरावा करण्याचा आव आणला. परंतु कसल्याही प्रकारची निर्यात बंदी उठवली नव्हती, हे स्पष्ट झालेलं आहे.
खरंतर सरकारने निर्यात बंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा देशाबाहेर गेला, तस्करी मार्गाने गेला, फायदा फक्त तस्कराचा व दलालांचा झाला. ग्राहकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झालं. मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं? हे सरकार शेतकऱ्यांसाठी धोरण राबवतोय का तस्करीसाठी? हे एकदा स्पष्ट होणे गरजेचे आहे. या देशात शेतकऱ्यांची काही किंमत आहे का? असा संतप्त सवाल यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला केला. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांना व्यक्त केले आहे.