महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी ठाणे

मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन ही एक धूळफेक – असीम सरोदे

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – मराठा आरक्षणाबाबत उद्याच्या विशेष अधिवेशन हे धूळफेक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी केलाय. या अधिवेशनाबाबत बोलताना असीम सरोदे यांनी जरांगे पाटलांची कुणीतरी दिशाभूल केली किंवा त्यांचा कोणीतरी मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून वापर करतायत असं मला वाटतं, सगेसोयरे अशा प्रकारची व्याख्या कायद्यात घ्यायची असेल तर ती एखादा नोटिफिकेशन किंवा सर्क्युलेशन काढून बदल होऊ शकत नाही. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल, त्यासाठी केंद्र सरकारने याबद्दलचा घटनात्मक बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि त्यांना नरेंद्र मोदींनी येऊन भेटले पाहिजे, असा आग्रह मनोज जरांगे पाटील यांनी ठेवला पाहिजे. त्यामुळे उद्याचं अधिवेशन विशेष अधिवेशन नावाने बोलावलं हे एक धूळफेक आहे असं कोणत्या आरक्षण देण्याचा हक्क सध्या तरी राज्य सरकारला नाही असे स्पष्ट केलं. असीम सरोदे डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षकांवर जबाबदारी टाकली जाते याबाबत असिम सरोदे यांनी देखील नाराजी व्यक्त केली. याबाबत असीम सरोदे यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडून विद्यार्थ्यांचा तसेच लहान मुलांचा वापर इलेक्शनच्या कामासाठी करू नये किंवा प्रचारासाठी करू नये असे नोटिफिकेशन काढले आहे मग या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा सुद्धा असा गैरवापर होऊ नये यासाठी वेगळी यंत्रणा तयार केली पाहिजे. निवडणूक आयोग्य स्वायत्त यंत्रणा आहे त्यांनी स्वतःची वेगळे टीम तयार केली पाहिजे. इलेक्शनच्या कामासाठी पदवीधर असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देऊन तात्पुरत्या कामासाठी घेतलं पाहिजे. निवडणुकीच्या कामासाठी पगारदार म्हणून कुणाला तरी तात्पुरता स्वरूपात नेमणं हे अधिकार निवडणूक आयोगाला हे शिक्षकांना वेठीस धरणे चुकीचं असल्याचे सरोदे यांनी सांगितले.

सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत असीम सरोदे यांना विचारले असता त्यांनी कायदेशीर दृष्टिकोनातून बघितलं तर हे सरकार अस्तित्वात येणं चुकीचं आहे मात्र सध्या निवडणूक आयोग हे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चालणारी पटीत संस्था झाली आहे तर निवडणूक अधिकारी हे पाळीव अधिकारी झाल्याचे टीका केली. त्यामुळे त्यांना सांगितल्याप्रमाणे निर्णय घेतात राहुल नार्वेकर कायदा धाब्यावर बसवून त्यांना जसं सांगण्यात आलं तसा निर्णय देतात हे माझं स्पष्ट मत आहे . आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटच्या अपेक्षा केले जाऊ शकते जिथे सगळे निर्णय हांणून पाडले जातील कायदा प्रस्थापित केला जाईल.

पुढे पुढे राजकारणाबाबत बोलताना असीम सरोदे यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं. महाराष्ट्रात काँग्रेस एकमेव पक्ष फुटला नव्हता मात्र अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेतलं. मला असं वाटतं काँग्रेसमुक्त राजकारण करायचं असं भाजप स्वप्न दाखवत होते ते आता काँग्रेसयुक्त भाजपा असं झाल्याचे टीका त्यांनी केली. भाजपाने आत्तापर्यंत काँग्रेस सह इतर पक्षांच्या जितक्या लोकांना घेतलं एकनाथ शिंदे यांना आपल्या जवळ बसवले हे सर्व भाजप फोडण्यासाठी कारणीभूत ठरणार आणि ही खूप मोठी डोकेदुखी भाजपने घेतली आहे ती मोठी राजकीय चूक करतायत, असं सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठ्या प्रमाणात राजकीय वापर होतोय तो चुकीचा आहे ते जनतेचा राजा होते पण तेच एकही पैसा स्वतःसाठी प्रसिद्धीसाठी मुळातच वापरत नव्हते. सध्याची जाहिरातबाजी सुरू आहे जाहिरात बाजीच्या भरवशावर कोण पंतप्रधान होणार असेल असं ठरवायचं असेल तर महाराष्ट्रात जाहिरात जातीच्या जोरावर एकनाथ चिंतेत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज असते तर सर्व रोष त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारच्या जाहिरातबाजीवर व्यक्त केला असता. सर्वसामान्यांच्या गरजांसाठी खर्च करणे आवश्यक असताना तुम्ही जाहिरात बाजूसाठी कसं काय खर्च करू शकता यांना शिवाजी महाराजांचा धोरणांचा विचार नाही यांना म्हणून फक्त शिवाजी महाराजांना घोड्यावर बसवून भावनिक राजकारण करायचंय आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे दिसायला लागले असल्याचे त्यांनी संगीतले

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×