नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
परभणी/प्रतिनिधी – मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यासोबत युती झाली आहे. या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून हिंगोली आणि बुलढाणा या दोन जागा संभाजी ब्रिगेडला मिळाव्यात यासाठी सकारात्मक चर्चा झाली आहेत. निर्णय अद्याप झाला नसला तरी लवकरच होईल.असे यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले.
समाजातील प्रत्येक जातीमध्ये भांडण लावण्याचे काम आरएसएस आणि त्यांची पिलावळ करीत आहे. भाजप देखील यामध्ये सहभागी आहे.त्यामुळे समाजाची शांतता भंग झाली आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती ची ताकद सध्या वाढलेली आहे त्या तुलनेत समाजात एकोपारावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटना मात्र कमजोर झाले आहेत. त्या कमजोर झालेल्या संघटनाच एकत्रित करण्याचे काम सध्या आम्ही करत आहोत. राज्य सरकारला 62% च्या वर आरक्षण देता येत नाही. पण सरकार आश्वासन देत आहे ते आश्वासन काही खरे नाही सरकार वेळ काढूपणा करत असल्याचे देखील खेडेकर म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही आणि मिळाले तरीही ते न्यायालयामध्ये टिकू शकत नाही. त्यामुळे सरकारने मनोज जरांगे यांच्याशी बातचीत करून त्यांच्याकडून वेळ घ्यावा आणि योग्य तो तोडगा काढावा असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले आहेत