नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – सध्या धुळे शहरांमध्ये मोबाईल चोरण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरत असल्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून धुळे पोलीस या मोबाईल चोरट्याचा कसून शोध घेत होते. पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एलसीबीच्या पथकाने कबीर काझी या मोबाईल चोरट्याला ताब्यात घेतले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरांमध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत असताना या मोबाईल टोळीला गजाआड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले होते. धुळे शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले होते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत, सदर मोबाईल चोरी करणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. याच विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी तपासणी करीत कबीर काजी याला ताब्यात घेतले याच्या कडून लाखो रुपयाचे तब्बल 15 मोबाईल हस्तगत केले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव रोड परिसरातील गजानन कॉलनी येथे कबीर कांती हा मोबाईल चोरी करण्यासाठी आला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून विविध कंपन्यांचे तब्बल 15 मोबाईल ताब्यात घेत या कबीर काझिने अजून किती ठिकाणी हात साफ करत मोबाईल चोरी केले आहे, याचा अधिक तपास धुळे पोलीस करीत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.