महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

यवतमाळ/प्रतिनिधी – यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वस्तीगृहामध्ये एका एमबीबीएस विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुहानी सहदेव ढोले असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत होती.

आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. दरम्यान या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील चौकशी शहर पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहेत, अशी माहिती यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी दिली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×