नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीत घरात काम करणाऱ्या एका मोलकरणीने घरातील जवळपास पाच लाखांचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी या मोलकरणीस अटक केली आहे. डोंबिवली पूर्वेतील सृष्टी सुदामा या इमारतीत राहणाऱ्या राजेश सोमवंशी या वयोवृद्धाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, १९ डिसेंबर रोजी त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे घड्याळ आणि रोख रक्कम चोरी झाले आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरिक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी तपास सुरु केला.
या तपासादरम्यान पोलिसांनी घरात काम करणारी मोलकरीण हीची विचारपूस केली. विचारपूस करताना पोलिसांच्या लक्षात आले की, साक्षी हिच्या जबाबात तफावत आहे. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता ही माहिती समोर आली की, तिने घरातील ऐवज लंपास केला आहे. रामनगर पोलिसांनी मोलकरणीला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.