नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीत राजूनगर खाडीत एक अडीच वर्षाची चिमुकलीसह तिचे आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी फायर ब्रिगेड यांनी शोध मोहीम सुरु केली आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्यांना शोधत आहेत. या दोघांची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात खाडी किनारी एक वयोवृद्ध इसम तिच्या अडीच वर्षाच्या नातीसोबत आले होते. ती मुलगी खेळत होती. खेळत असताना ती खाडी किनारी गेली. अचानक ती पाण्यात पडली. तिला पाहून बसलेले वयोवृद्ध तिला वाचविण्यासाठी धावले. त्यांनी पाण्यात उडी मारली. चांद शेख नावाचा तरुण या दोघांना वाचविण्यासाठी धावला. मात्र, दोघेही बुडाले होते. काही अंतरावर चांद शेख यांनी त्या आजोबांचा हात पाहिला. मात्र, तो त्यांना वाचवू शकला नाही. याची माहिती मिळताचं माजी नगरसेवक विकास म्हात्रे घटनास्थळी पोहचले. त्यांनी याची माहिती विष्णूनगर पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलीस पथकासोबत खाडी किनारी पोहचले. फायर ब्रिगेडचे पथकही दाखल झाले आहे. शोध मोहीम सुरु झाली आहे. हो दोघे कोण होते? ते कुठुन आले? याचा तपास पोलीस करत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.