नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – धुळ्यातील जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरुन होणारी अवैध्य गुटख्याची तस्करी उधळत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल ६५ लाखांचा गुटखा पकडला आहे. मध्यप्रदेशातून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला वेळीच अडवून पोलिसांनी गुटखा माफियांना आणखी एक दणका दिला आहे. सोनगीर टोलनाक्याहून गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळताच काल पोलिसांनी सापळा रचून सदरची कारवाई केली.
आज दुपारच्या सुमारास संशयीत कंटेनर (एम. आर.३८/एसी ०४२२) सोनगीर टोल नाक्याजवळील हॉटेल सत्यम समोर येताच एलसीबी पथकाने अडविला. यावेळी वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावार गुटख्याचा साठा मिळून आला, यात ५६ लाखांचा शिखर पानमसाला, ८ लाख ८२ हजाराची एसएस तंबाखु व २० लाखांचा कटेनर मिळून ८५ लाख ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिला.
याप्रकरणी धुळे पोलिसांनी कंटेनर चालक नरेशकुमार घनश्यामसिंग चौधरी (४६) रा. मुरसाना, सहकारी नगर (उत्तर प्रदेश) याच्याविरुध्द सोनगीर पोलिसांत अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ कलमांचे उल्लंघन, ३० (२) अ चे उल्लंघन, कलम ५९ तसेच भादंवि ३२८,९८८,२२७,२७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी व त्यांच्या पथकाने केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी यावेळी दिला.