महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
पर्यावरण लोकप्रिय बातम्या

कल्याणच्या गिर्यारोहकाने एव्हरेस्ट बेस कॅम्प वर फडकवला तिरंगा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

कल्याण/प्रतिनिधी– कल्याण येथील प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशिल जयदेव अंबादे यांनी 13 दिवसापर्यंत चाललेल्या भारत नेपाल मोहिमेअंतर्गत एवरेस्ट बेस्ट कॅम्प वर तिरंगा फडकवला आहे.या मोहिमेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्य महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक आणि दिल्ली येथील आठ गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला होता.

प्रशिल अंबादे यांनी या मोहिमे अंतर्गत जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्टच्या बेस कॅम्प ज्याची समुद्रसपाटीपासून उंची 17,598 फूट आहे,या जागेवर पोहोचून तिरंगा फडकवला आहे. तेरा दिवस चाललेल्या या मोहिमेमध्ये कमी वायुदाब, कमी ऑक्सिजन,लांबवर पसरलेले रस्तेअन उपलब्ध पाणी अशा अनेक कठीण परिस्थितीला पार करत समोर जावे लागते. प्रशिलने एव्हरेस्ट बेस कॅम्प वर पोहोचून लोकांना पृथ्वीवर वाढत्या तापमानाकारण ग्लेशर वितळून होणाऱ्या नुकसाना बद्दल माहिती दिली. लोकांना स्वच्छतेचा संदेश तसेच जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी विनंती केली, जेणेकरून येणाऱ्या काळात वाढत्या तापमानाने वितळणाऱ्या ग्लेशरला आपण वाचवू शकू. या मोहिमेदरम्यान प्रशिल अंबादे यांनी वृक्षतोडीकरण जागतिक तापमान वाढ होऊन पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच वाढत्या तापमानाला कमी करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव मार्ग असेही त्यांने तिथे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×