नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
अहमदनगर/प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी संगमनेरच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल आहे.गेल्या दोन महिन्यापासून सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संस्थांनी जाणीवपूर्वक दुधाचे बाजारभाव पाडल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यापासून दुधाला प्रति लिटर 26 ते 28 रुपये बाजार भाव मिळत आहे. राज्य शासनाने दुधाला 34 रुपये प्रति लिटर हमीभाव ठरवून दिला असतानाही केवळ खाजगी आणि सहकारी दूध उत्पादक संस्थांनी संगणमत करून हे बाजार भाव पाडण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
त्यातच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशुखाद्याचे बाजार भाव कमी करण्याची ग्वाही दिली होती ,मात्र कंपन्यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पशुखाद्याचे बाजार भाव प्रति बॅग शंभर ते दीडशे रुपये वाढवले आहे.शेतकऱ्यांनी दुष्काळामध्ये जनावरांना चारापाणी मोठ्या कष्टाने उभा करून कवडीमोल दुधाला बाजार भाव मिळत असल्याने जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.