नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
जालना/प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चात मंत्री छगन भुजबळ व इतर नेत्यांनी मराठा समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य करून खालच्या पातळीत टीका केल्यामुळे आज पैठण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण – छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. मंत्री छगन भुजबळ,विजय वडेट्टीवार,गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तिव्र शब्दात निषेध आंदोलन करण्यात आले.संविधानिक पदावर मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांचा राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट जाहीर करावी अशी मागणी ही आंदोलकांनी यावेळी प्रशासनाकडे केली आहे.