नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
अहमदनगर/प्रतिनिधी – अहमदनगर येथील एक कोटीच्या लाच प्रकरणातील फरार असलेले संशयित मुख्य आरोपी गणेश वाघ यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिक धुळे महामार्गावर अटक केली आहे. कोर्टात हजर केले असता त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे देखील एसीबी विभागाकडून सांगण्यात आला आहे.
या सहा दिवसांमध्ये गणेश वाघ यांच्या घराची झाडाझडती घेण्यात येणार आहे. धुळे एमआयडीसी येथील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला शोधण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली होती आणि त्यांना काल धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.३ नोव्हेंबर रोजी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर एमआयडीसी बायपास रस्त्याजवळ एक कोटीची लाच घेताना सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला रंगेहाथ अटक केली होती.पुढील तपा