नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
बीड/प्रतिनिधी – बीड मध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आज पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन जे थेट सहभागी आहे त्यांच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही परंतु ज्यांचा यामध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावर कारवाई करू नका, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच आंदोलनामध्ये अनेक प्रकार समोर आले असून काहींनी स्वतःचीच हॉटेल, दुकानं पेटवल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी यावेळी केला.