नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम
नाशिक/ प्रतिनिधी – एकीकडे लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समित्या तर दोन खाजगी बाजार समित्यांमध्ये कांदा धान्याचे लिलाव गेल्या सात नोव्हेंबर पासून बंद असतांना लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे कांद्याचे लिलाव सुरु असून काल सकाळच्या सत्रात 750 वाहनातून उन्हाळ आणि नवीन लाल कांद्याची आवक दाखल झाली असून आज पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याच्या लिलावाचे शुभारंभ सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक पंढरीनाथ थोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी येवला तालुक्यातील ठाणगाव पिंपरी येथे योगेश्वर ठोंबरे यांच्या नवीन लाल कांद्याला 4 हजार 500 रुपये इतका उच्चाकी तर सरासरी 4 हजार 100 रुपये बाजार भाव मिळाला तर उन्हाळ कांद्याला जास्तीतजास्त 4500 रुपये, कमीतकमी 2100 तर सरासरी 3800 रुपये इतका प्रतिक्विंटलला मिळाले असून सर्व बाजार समित्या लवकर सुरु करा व कांद्यावरील निर्बंध रद्द कर अशी मागणी शेतकऱ्यांनी केली .