रत्नागिरी/प्रतिनिधी – गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली आहे. निरज हिरासिंग बिश्त असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याला चिपळूण रेल्वे स्टेशन येथील माऊली अपार्टमेंटमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
तो मुळचा झारखंडचा रहीवासी आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीची लोखंडी पिस्तुल, दोन लोखंडी मॅगजीन, ४६ जीवंत राऊंड, 2 काळ्या रंगाचे फायटर पंच, दोन मोबाईल हँडसेट असा जवळपास 88,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related Posts