नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
जळगाव/प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत एक आगळावेगळा असा उपक्रम दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेला आहे.यात इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांनी कार्यानुभव या विषयावर विविध कलाकृती त्यांना करता यावी व त्यांच्यात वेगवेगळ्या कला रुजाव्यात यासाठी शिक्षकांनी त्यांना येणाऱ्या दिपोत्सवानिमित्त आकाश कंदील बनवण्यासाठी प्रेरित केले. त्यानुसार या चिमुकल्यांनी वेगवेगळ्या आकर्षक अशा डिझाईन असलेले टाकाऊ पासून आकाश कंदील बनवण्याचा आगळा वेगळा प्रयोग खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत राबविण्यात आला आहे.
या उपक्रमाचे खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष हनीफ शेख व उपाध्यक्ष वाल्मीक दाभाडे यांच्यासह सदस्य युवा नेते बापू पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. यावेळी खडकदेवळा खुर्द येथील ग्रामस्थांनी देखील या चिमुकल्यांच्या आकर्षक अशा आकाश कंदीलांच्या डिझाईन असलेले आकाश कंदील पाहून कौतुक केले आहे.त्यांना मुख्याध्यापक रविंद्र शिंदे,शिक्षक शरद पाटील,आजित चौधरी,संध्या पाटील,भारती खैरनार, आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.