नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून आर झोन मध्ये असलेल्या कंपन्याना (HAZARDOUS RED CATEGORY) रहिवासी विभागांमध्ये परवाने दिल्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
रहिवाशी झोन मधील HAZARDOUS RED CATEGORY कंपन्याचे उद्योग परवाने रद्द करावेत आणि l परवाने देणारे अधिकारी व परवाने घेणारे मालक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता.
गेल्या अनेक महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी कडे ठाणे, पालघर, नवी मुंबई तसेच मुंबईतील नागरिकांकडून यासंदर्भात तक्रारी येत होत्या. यात hazardous red category सारख्या श्रेणीतील अनेक धोकादायक कंपन्यांना residential zone मध्ये लायसन्स परमिट केलं आहे आणि त्यामुळे या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे काही आदिवासी पाड्यातील रहिवाश्यांना, झोपडपट्टी विभागातील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा दुष्परिणाम पर्यावरणावर तर होतोच आहे त्याचसोबत तिथल्या स्थानिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. याचे गांभीर्य जाणून वंचित बहुजन आघाडी कडून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नेते सुजात आंबेडकर यांनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ह्याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मुंबईतील एअर quality index चा आधार घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातल्या प्रदूषणाकडे, व प्लांट उभारनिकडे दुर्लक्ष केलं आहे असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. जगभरातील अनेक नामांकित शहरे ज्यांची तुलना मुंबईशी होते ह्यांचा एअर क्वालिटी इंडेक्स हा १० च्या वर नाही पण मुंबई चा ११२ आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. ज्या प्रमाणे दिल्लीत १० वर्षापासून प्रदूषणाची मोठी समस्या आहे त्याच प्रमाणे मुंबईत देखील ही समस्या होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. ही बाब मुंबईकरांसाठी दुर्दैवी आहे. टाटा इन्स्टिट्यूट च्या रिपोर्ट नुसार अनेक मुंबईतील नागरिक हे दावाखान्यात आहेत याचं कारण म्हणजे स्वच्छ हवा श्वास घ्यायला मिळत नाही आहे. सुप्रीम कोर्ट च्या आदेशाला डावलून यांनी ह्या कंपन्यांना परमिट दिले आहेत आणि इतर सर्व पक्ष आणि त्यांचे नेते यांनी स्वतःचे अर्थसंबंध जपण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. यातून ते स्वतःच्या पक्षातील सालगडी, कॉन्ट्रॅक्टर, मित्र यांना श्रीमंत करण्यासाठी असे जाणीवपूर्वक करत आहेत, अशी घणाघाती टीका सुजात आंबेडकर यांनी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, महिला अध्यक्षा सुनिता गायकवाड, युवा अध्यक्ष परमेश्वर रणशुर, मुस्लिम आघाडी अध्यक्ष दौलत खान तसेच मुंबई, जिल्हा तालुका वॉर्ड पदाधिकारी उपस्थित होते