नेशन न्यूज मराठी टीम.
सांगली/प्रतिनिधी -आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या 18 ऑक्टोबर 2023 पासून आपल्या मागण्या घेऊन बेमुदत संपावर गेल्या आहेत.परंतू सरकार काही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. एकीकडे शासन असे म्हणते कि आशा व गटप्रवर्तक या आरोग्य विभागाचा कणा आहे.त्यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णांना सेवा दिली आहे व दुसरीकडे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या संपावर जाण्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होतो आहे.म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या वर कारवाई करण्यात यावी म्हणून शासनाने परिपत्रक काढले आहे. या दुपटी धोरणाचा या आंदोलनात निषेध करण्यात आला.
प्रसासानाच्या परिपत्रकाची या आंदोलनात होळी करण्यात आली.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य करव्यात अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. गटप्रवर्तकांचे शासकीय सेवेत समायोजन करा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दिवाळी भाऊबीज देण्यात यावी,ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये,आशा स्वयंसेविका यांना शासकीय सेवेत समायोजन करा अशाही विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.