नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – मुंबई येथील शिवाजी पार्कवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी धुळे शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिक आज सकाळी धुळे दादर एक्सप्रेस ने मुंबईच्या दिशेने रवाना झाले यावेळी शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळाला.
राज्यात झालेल्या सत्तांतराच्या नंतर आज मुंबई येथील शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुसरा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात? आणि कुणाचा समाचार घेतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर हजारोंच्या संख्येने येण्याचे आवाहन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई सह राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी दाखल होणार असून धुळे शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिक धुळे रेल्वे स्थानकातून सकाळी सात वाजता सुटणाऱ्या धुळे दादर एक्सप्रेस ने मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. यावेळी खानदेशी वाद्यांच्या तालावर शिवसैनिकांनी ठेका धरत जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करीत धुळे रेल्वे स्थानक दणाणून सोडले होते.