नेशन न्यूज मराठी टीम.
यवतमाळ/प्रतिनिधी – कारेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह 29 लाख 46 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. 16 जणांवर वडगाव जंगल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
कारेगाव शेतशिवारात जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून छापा टाकला असता, डावावर दोन लाख 360 रुपये मिळाले. अंगझडतीत तीन लाख एक हजार 820, अशी पाच लाख दोन हजार 180 हजारांची रोकड, मोबाईल व वाहने असा एकूण 29 लाख 46 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारींविरुद्ध वडगाव जंगल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनेने यांनी दिली.