नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार/प्रतिनिधी – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समितीच्या वतीने कापूस खरेदी सुरू झाली असून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीत शेतकऱ्यांना शासकीय दराप्रमाणे दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे त्या साठी शेतकऱ्यांनी कापसाचे गुणवत्ता कायम ठेवावी असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात पीक विमा कंपन्यांसोबत बैठक झाली असून पहिल्या टप्प्यात आलेल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आलेल्या शेतकऱ्यांना सरकार पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत मिळवून देणार आहे त्यासाठीचे कारवाई सुरू झाली असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाला शहादा तालुक्यातील शेतकरी आणि कापूस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाचे उत्पादन कमी झाले असून येत्या काळात कापसाचे दर वाढण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. शहादा प्रमाणे राज्यातील इतरही बाजार समितीने बाजार समितीमार्फत कापूस खरेदी सुरू करावी असे आवाहन मंत्री अनिल पाटील यांनी केले.