नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 साली येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली. “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरीदेखील हिंदू म्हणून मरणार नाही” अशी घोषणा येवल्यातील मुक्तिभुमी येथे केली. शहरातील या मुक्तीभूमीवर दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण भारतातून मुक्तिभूमि येथे क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संखेने भीमसैनिक येत असतात.
यावर्षी धर्मांतर घोषणेचा 88 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून सकाळ पासूनच क्रांतीस्तभास मानवंदना करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी हजेरी लावत आहेत. सकाळीच शहरातून धम्म रॅली काढण्यात येऊन पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते यावेळी संपन्न झाले. बाळासाहेब आंबेडकर यांनी क्रांती स्तंभाला मानवंदनाही दिली.