नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबई मध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मालवणी पोलिसांनी अशा चोरी करणाऱ्या सराईत चोरांना अटक करून नागरिकांना दिलासा दिला आहे.. अशीच एक चोरीची घटना मालवणी परिसरात घडली होती आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात आरोपी एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून मोबाईल चोरी करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून व फिर्यादीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीचा शोध मालवणी पोलिसांनी सुरू केला.
तपास सुरू असताना पोलिसांना आढळून आले की, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून ही त्याची चित्रे आहेत. सूत्रांच्या आधारे सब्बीर स्टीव्हन उर्फ लॉरेन्स नामक आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपी ज्याला मोबाईल विकायचा तो इम्तियाज उस्मान शेख उर्फ इम्तियाज बाटला त्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपीकडून 47 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त केले आहे. ज्याची किंमत अंदाजे 6 लाख 70 हजार रुपये आहे. हे दोन्ही आरोपी मालवणी येथील रहिवासी असून या दोन आरोपींनी आतापर्यंत किती मोबाईल चोरले आहेत आणि मोबाईल कोठे विकले याचा तपास मालवणी पोलीस करत आहेत.