नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – भारतीय खेत मजूर युनियन सलग्न महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या चौदाव्या राज्य अधिवेशनानिमित्त आज शहरातील टीव्ही सेंटर परिसरातून दिंडी काढून जळगाव रोड येथील कार्यालयामध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली.शेतमजूर हा सर्वात खालच्या स्तराचा मजूर आहे.
त्यांच्या रोजगार, त्यांचे स्वास्थ, घर जमीन आणि शिक्षण तसेच शेतमजूर यांच्यावर होत असलेले अत्याचार याचा विरोध करणे हे मुद्दे या अधिवेशनात मांडण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्रातील शेतमजूर या अधिवेशनात सामिल झाले होते. यावेळी शेतमजुरांनी सरकार पुढे विविध मागण्या ठेवल्या आहेत .
राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांना एक वर्ष सततचे काम द्यावे, मनरेगाला लागू करावे कमीत कमी दोनशे दिवस काम, प्रत्येक दिवस सहाशे रुपये पगार, साठ वर्षाच्या नंतर पाच हजार रुपये पेन्शन द्यावी आणि त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचार विरोधात एक कडक कायदा बनविण्यात यावा अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.यावेळी मोठ्या संख्येने शेतमजूर उपस्थित होते,