नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होल्डिंग वर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आला आहे, त्यामुळे हा शहरात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.
शरद पवार यांनी अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये असं सुनावलं होतं. त्यानंतर आता पवार यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचे फोटो नाशिक मधील बॅनर वर झळकले आहेत, चव्हाण यांनी पवार यांना मानसपुत्र मानलं होतं,चव्हाण हे देशाचे संरक्षण मंत्री झाल्यावर नाशिक मधून लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते, त्याच ठिकाणी अजित पवार गटाने चव्हाण यांचे फोटो बॅनर वर लावण्यास सुरुवात केली आहे.