नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी– पुण्यावरून मुंबईच्या दिशेला येणारी मुंबई डेक्कन एक्स्प्रेसला कल्याण रेल्वे स्थानकात थांबा नसताही धावत्या गाडीतून उतरणाऱ्या दोन प्रवाशांपैकी एकाचा मृ-त्यू तर एक प्रवासी जखमी झाल्याची घटना सकाळी ९.३०च्या सुमारास घडली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला असून रियाज अली व फरीद अन्सारी असे दोघांची नावे असून हे दोघे पुण्यावरून कल्याणला एक्सप्रेस गाडीतून येत होते. मात्र एक्सप्रेस गाडीला कल्याण मध्ये थांबा नसतान दोघांनी उतरण्याचा प्रयत्न केल्याने यात फरीद अंसारी याचा मृत्यू झाला असून रियाज अन्सारी वर उपचार सुरू आहेत. कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर ही घटना घटली असून याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.