महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

सरकारी रुग्णालयातील बळी प्रकरणी आरोपींवर कारवाईची मागणी

नेशन न्यूज मराठी टीम.

अहमदनगर / प्रतिनिधी – शासकीय रुग्णालयात सध्या मृत्यूने थैमान घातले आहे. शासकीय रुग्णालयातील गलथान कारभार यानिमित्ताने नागरिकांसमोर येत आहे. नांदेड, संभाजीनगर, नागपूर व या पूर्वी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा व आवश्यक ते डॉक्टर व कर्मचारी स्टाफ नेमला नसल्याने ,लहान बालकांचे मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू म्हणजे सरकारी अनास्थेचे बळी असून राज्याचे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ॲड सुभाष लांडे व राज्य कौन्सिल सदस्य डॅा संजय नांगरे यांनी केली आहे.

शासकीय रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध न करता सर्व सामान्य माणसांना मृत्यूच्या खाईत लोटले जात आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खाजगीकरणाचा सरकारचा हा डाव असून जनतेने सरकार चा हा डाव उधळून लावला पाहिजे व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन करून भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लाल बावटा रिक्षा युनियन च्या वतीने आज शेवगाव येथे नांदेड, संभाजीनगर, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या बालकांना व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×