नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – सध्या नांदेड येथील रुग्णालयात प्रशासकीय अडचणीमुळे रुग्ण अडचणीत आहेत , प्रसंगी त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. शासकीय आरोग्य सेवेतील या गलथान कारभाराचा प्रश्न सर्वत्र असल्याचे दिसून येत आहे. शिवाय सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने होणार असल्याचा जी आर देखील आला आहे. व प्रकल्पांचे खाजगीकरण देखील केले जात आहे. या निषेधार्थ आंदोलने केली जात आहेत. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीचे खाजगीकरण करु नये यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.
घाटी मध्ये सर्व सुविधा दिल्या आहे म्हणतात तरीही रुग्णांना बाहेरून औषधे व गोळ्या आणाव्या लागत आहेत. ऑपरेशन साठी संपूर्ण सामग्री नाही ती शासनाने पुरवावी, गोरगरिबांच्या घाटीचे खाजगीकरण थांबवावे अशा मागण्यांसाठी आज आर एम ओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. नांदेड मध्ये मृत्यु प्रकरणाला सरकार जबाबदार आहे असे आंदोलकांचे म्हणणे आहे.