नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – शासकीय आरोग्य सेवेचा प्रश्न सध्या गंभीर स्वरुपात पुढे आला आहे. शासकीय रुग्णालय आणि प्रशासन नागरी आरोग्य सेवा पुरविण्यात अपयशी ठरल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध तुटवड्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रुग्णांकरिता लागणारी अत्यावश्यक औषधे भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.
आरोग्य यंत्रणा हाताळण्यात अपयशी ठरलेले आरोग्य मंत्री सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि धाराशिवच्या मेडिकल कॉलेजसाठी 100 कोटींचा निधी आणल्याचे सांगणारे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राजीनामा देऊन घरी बसावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.