नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – वाळू माफिया आणि त्यातून उद्भवणारे वैमनस्य ठाणे जिल्ह्याला नवीन नाही. ठाणे किनारालगत सतत छापे टाकून अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर यापूर्वी हि कारवाई केली आहे. आता पुन्हा एकदा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे तहसिलदार यांच्या माध्यमातून मुंब्रा खाडीत अवैध वाळु उपसा करणाऱ्या एका बोटीवर महसुल विभागाच्या टीम ने कारवाई केली आहे. मुंब्रा ते डोंबिवली या खाडी पात्रात गस्त घालत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैध वाळु उपसा करणारी बोट आढळली. त्यानंतर नायब तहसिलदारआणि ठाणे तलाठी ,जिल्हाधिकारी कार्यालयाचे दक्षता पथक २ च्या टीम ने ह्या बोटीवर तडक कारवाई सुरु केली.
ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीत तोडून टाकली. १२ सप्टेंबर रोजी ह्याच मुंब्रा खाडी पात्रात जेलेटीन आणि डेटिनोटर च्या काड्या असलेली अनधिकृत बोट आढळली होती. आज पुन्हा अशी अनधिकृत बोट खाडी पात्रात आढल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे खाडी पात्रात मेरीटाईन बोर्ड व सागरी पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.