नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती/प्रतिनिधी -नांदेड,घाटी रुग्णालयात झालेल्या मृत्यू मुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार त्यामुळे चव्हाट्यावर आला आहे . या घटनेचा राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारचा चांगलाच संचार घेतला आहे.
त्या म्हणाल्या या ट्रिपल इंजिन सरकारचं नियोजन नसल्यामुळे घाटी आणि नांदेड येथील पन्नास लोकांना जीव गमावावा लागला. आज 12 लहान बालकांचा जीव गेला, याला जबाबदार महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार आहे. आम्ही खटला भरणार आहोत. राजकीय विषय म्हणून नव्हे तर माणुसकीच्या नात्याने हा खटला भरू, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे सांगितले. आज शिंदे व फडणवीस तातडीने दिल्लीला गेले मात्र अजित पवार गेले नाही यावर मात्र सुप्रिया सुळे यांनी बोलणे टाळले. मी नांदेड, घाटी मृत्यू प्रकरणावर बिझी असल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे या कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी अमरावतीत आल्या होत्या.
राज्यातील सरकार हे असंवैधानिक कामे करत आहे. कंत्राटी भरतीला आमचा तीव्र विरोध राहणार आहे. कंत्राटी भरती करत आहात तर पब्लिक सर्विस कमिशन कशासाठी आहे? मंत्रालय ही कंत्राटीवर देणार असाल तर सरकार कशासाठी असते? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी कंत्राटी भरतीचा विरोध केला. संविधानाच्या चौकटी बाहेर जाऊन सरकार काम करत असेल तर आगामी काळात यावर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.