नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – नांदेड रुग्णालयात झालेल्या मृत्यू मुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे, आरोग्य विभागाच्या निष्काळजी पणा मुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व कारभाराच्या विरोधात आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहे. झालेल्या दुर्देवी घटनेच्या विरोधात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
महाराष्ट्रातील भाजपा प्रणीत येड्यांच सरकार हे लोकांच्या जीवावर उठलेल सरकार आहे. पहिले मुख्यमंत्री ज्या ठिकाणी राहतात त्या ठाण्यामध्ये लोकांचा जीव गेला आता नांदेडमध्ये तर रेकॉर्ड ब्रेक झाला ३८ च्या वर लहाण मुलांपासून ते मोठ्या पर्यंतचा जीव गेला.त्यामुळे या सरकारच्या कामकाजावर आमचा निषेध आहे.अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महाराष्ट्राच्या विधानसभेचे जे पावसाळी अधिवेशन झाले त्यावेळेस आम्ही सांगितले होते की राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरोग्याचा कायदा करावा आणि आरोग्याचा कायदा हा बंधनकारक असावा मग शासकीय रुग्णालय असतील किंवा खासगी रूग्णालय असतील याठिकाणी कोणाचाही पैशा अभावी जीव जाता कामा नये शिक्षण व आरोग्य प्रत्येक मनुष्य जीवनाचा तो अधिकार आहे.असे म्हणत त्यांनी सरकारचा निषेध केला.