नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – आज सकाळी मुंबईतील दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावात मगरीचे पिल्लु आढळून आले असल्याने त्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दोन फूट आकाराचे मगरीचे पिल्लु या जलतरण तलावात आढळून आले आहे.या मगरीची सुटका करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.तरणतलावात मगरीचे हे पिल्लू कोठून आले, याचाही तपास केला जात आहे, जेणेकरून भविष्यात त्याची काळजी घेता येणार आहे. एखादी दुर्घटना घडू नये यासाठी मदत होणार आहे.
महात्मा गांधी जलतरण तलावात मगरीचे पिल्लु सापडले आहे. हे मगर जलतरण परिसराबाहेर असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आले असल्याचे काहीचे म्हणणे आहे. तसेच हे प्राणीसंग्रहालय पण अनधिकृतपणे चालू असल्याचे आरोप मनसे नेते यांनी केला आहे. मात्र या प्राणी संग्रहालयाचे मालक युवराज मोहगे यांच्या माहितीनुसार हे प्राणी संग्रहालय अधिकृतपणे गेल्या ३१ वर्षांपासून सुरू आहे. या आधी अशी कधी घटना घडली नाही, आणि या प्राणी संग्रहालयात असे मगर नाहीत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्राणी संग्रहालयात पाहणी केली आहे. तसेच अधिकृत आणि अनधिकृत प्राण्यांची चौकशी सध्या सुरु आहे. पुढील तपास प्रशासन करत आहे.