नेशन न्यूज मराठी टीम.
धाराशिव/प्रतिनिधी – शिक्षक भरती खाजगीकरण ,अतिरीक्त काम या सह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली राज्यभर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. त्याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महा मोर्चा काढण्यात आला .
राज्य सरकारचे नवीन धोरण शिक्षण हक्क कायदा विरोधी असून ते बदलावे यासाठी शिक्षक दिनी काळ्या फिती लाऊन शिक्षकांनी आंदोलन केले होते,सरकारने ते आंदोलन गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे आज आक्रोश मोर्चा काढला.
तरीही निर्णय न बदलल्यास मुंबईत भव्य मोर्चा काढू असा इशारा शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबोर यांनी दिला. शिक्षकांना इतर कामामुळे विद्यार्थी भेट होत नसल्याची खंत महिला शिक्षिकेने व्यक्त केली.