नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – अतिवृष्टीने वस्तीत राहणारे नागरिक व शेतकरी यांचे अतोनात हाल झाले आहे. यासाठी सिटू कामगार संघटनेच्या वतीने 29 आणि 30 जुलै रोजी नांदेड शहरातील अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या वस्त्यांचा सर्वे केला होता. त्यानुसार गोर-गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहरातील सखल भागात पुराचे पाणी घरात गेल्यामुळे अन्न, धान्य, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच मोटारसायकल व इतर वाहने इत्यादी नादुरुस्त किंवा निकामी झाले होते. त्यामुळे रोजंदारी व मिळेल ते काम करणारा कामगार सर्वात जास्त या अतिवृष्टीचा बळी ठरला आहे.
पावसात सापडलेल्या कुटुंबातील अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी सन 2006 मध्ये अशीच अतिवृष्टी नांदेड शहरात झाली होती तेव्हा सिटू कामगार संघटनेच्या वतीने मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड येथे आंदोलने करून तातडीने सानुग्रह अनुदान स्वरूपात 5 हजार रुपये रोख आणि 20 किलो ग्रॅमची धान्य कीट मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.
त्याच धर्तीवर या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना रोख 20 हजार रुपये आणि 50 किलो ग्रॅमची रेशन कीट देण्यात यावी. यासाठी नांदेड मनपा आयुक्त यांना सिटू संलग्न मजदूर युनियनच्या वतीने दिनांक 31 जुलै 2023 रोजी सामूहिक अर्ज भरून विनंती करण्यात आली होती. आंदोलनाच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा हजार रुपये मंजूर केले होते. परंतु पूरग्रस्तांना अजून देण्यात आले नाहीत ते तातडीने बँक खात्यात जमा करावेत ही मागणी घेऊन तहसील कार्यालय नांदेड येथे बेमुदत सामूहिक उपोषण आणि धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.