नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – महाराष्ट्रात आपल्या विविध मागण्यासाठी नागरिकांकडून आंदोलने सुरु आहेत. भाजपा प्रणीत केंद्र व राज्य सरकारकडून जारी केलेले आदेश सामन्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आढळून येत नाही. यातच स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना अधिक कर वसुली करण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अमरावती महानगरपालिकेद्वारे शहरातील नागरिकांवर मालमत्ता कर प्रचंड प्रमाणात लादण्यात आलेला आहे. काही नागरिकांना वाढीव टॅक्स 3 पट, 5 पट तर काही नागरिकांना टॅक्स 6 पट वाढवून पाठविण्यात आलेला आहे. या टॅक्सची वाढ ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे.
गेल्या एका वर्षा अगोदर देखील अश्या प्रकारचा वाढीव मालमत्ता कर जनतेवर लादण्यात आला होता, तेव्हा अनेक आंदोलने झाली, तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगितीचे आदेश दिले होते. मात्र, स्थागितीचे आदेश देऊन सुद्धा अमरावती महानगरपालिकेचे भाजपा प्रणित प्रशासन मालमत्ता कर वाढीवर ठाम आहे, असा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला आहे. त्यासोबतच काँग्रेसच्या वतीने चक्काजाम आंदोलन करून घर टॅक्स पावतीची होळी करण्यात आली.