नेशन न्यूज मराठी टीम.
वर्धा / प्रतिनिधी – मराठा समाजाच्या आरक्षण मागणी नंतर धनगर समाजाने देखील त्यांना एसटी संवर्गात समावेश केला जावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. आता आदिवासी समाजाने देखील आपल्या काही मागण्यांसाठी वर्धा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून उपोषण केले आहे.
नारा येथील स्वर्गीय यादवराव केचे आदिवासी आश्रम शाळेत काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्याचा खून झाला होता. यापूर्वीही या शाळेत अशा घटना घडल्या असल्याचे म्हणत शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी .शिवाय धनगर बांधवांकडून आरक्षणासाठी एसटी वर्गात समावेश करण्यात यावा अशी जी मागणी केली त्यावर धनगर हे आदिवासी नाहीत. ते आदिवासी असल्याचे कोणतेही निकष पूर्ण होत नाही म्हणून त्यांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करू नये. असे देखील उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांच्या क्षमता चाचणी परीक्षा वर ज्या शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता, त्या शिक्षकांना निलंबित करण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने साखळी उपोषण वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ करण्यात आले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले.