नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – पर्यावरण पूरक उत्सवांना सध्या पसंती दिली जात आहे. त्यात आपला लाडका गणपती बाप्पा देखील इको फ्रेंडली साकारण्यासाठी मूर्तीकारांची चढाओढ सुरु असलेली पहायला मिळते. गिरगाव येथील मौलाना आझाद रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे टिशू पेपरच्या कागदापासून मुर्ती साकारण्यात आली आहे.
ही मुर्ती पर्यावरण स्नेह आणि पर्यावरण पूरक अशी मूर्ती आहे. टिशू पेपरने तयार केलेली ही कागदाची मूर्ती भाविक भक्तांना आकर्षित करणारी आहे. सलग ३ वर्षे या मंडळात टिशू पेपरने तयार केलेल्या मुर्तीची स्थापना होत आहे.या मंडळाचे यंदा ६३ वे वर्ष आहे.
कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आणि शाडू मातीची मूर्तीसुद्धा पर्यावरण स्नेही आहे. शाडू मातीची मूर्ती घरगुती गणपती साठी योग्य आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मध्ये पाच ते आठ फुटामध्ये शाडू मातीची मुर्ती असेल तर ती मुर्ती जड होते. या सगळ्याचा विचार करून हि कागदापासून मूर्ती साकारली गेली आहे.