नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसत आहे. दुष्काळग्रस्त म्हणून गणल्या जाणाऱ्या विदर्भ, मराठवाड्यालाही पावसाने चांगलेच झोपडले आहे. जनजीवन विस्कळीत होवून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर आणि शहरातील लगतच्या अंबाझरी, सीताबर्डी, मोर भवन, व्हरायटी चौक या भागातील परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते.
नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्रातील मुख्यालयाच्या पूर बचाव तुकड्या पाठविण्याची मागणी केली होती. 23 सप्टेंबर रोजी पूर बचाव कार्यासाठी अंबाझरी परिसरात अभियंते, उपकरणे आणि बोटींसह भारतीय लष्कराच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या तुकड्यांमधील भारतीय लष्कराच्या जवानांनी सर्व वयोगटातील सुमारे 40 लोकांची सुटका केली आणि त्यांना वैद्यकीय मदतही केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
मात्र नागपूर, काम्पटी आणि चंद्रपूरमधील पूरस्थिती लक्षात घेता, नागपूर जिल्हा प्रशासनाने भारतीय लष्कराच्या पथकांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.