नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – एकीकडे अपुऱ्या पावसाअभावी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा म्हणून शेतकरी महाराष्ट्रातील काही ठिकाणी चिंतेत असताना दुसरीकडे मात्र परतीचा पाऊस म्हणताना ढगफुटी झाल्यासारखा झोडपणाऱ्या पावसाने लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. लोकांचे राहते घर, शेती, पाळीव जनावरे यांचे प्रचंड नुकसान होते. बीड जिल्ह्यात हीच परिस्थिती सध्या दिसून आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढल आहे.
आष्टी तालुक्यातील बाबी गावासह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर या पावसात डोईठाण येथील पूल वाहून गेल्याने जवळपास दहा गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात 6 शेळ्या वाहून गेल्यात. दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानं नदीला नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी शेतात गेल्याने खरिपाची पिकं देखील धोक्यात आली आहे.