नेशन न्यूज मराठी टिम.
रायपूर/प्रतिनिधी – छत्तीसगडमध्ये आदिवासींची लोकसंख्या 32 टक्के असूनही, आदिवासींना त्यांचा फायदा तर सोडा उलट त्यांचे सातत्याने नुकसान होत आलेले दिसून येते. आदिवासींना बांधवाना काँग्रेस आणि भाजपने कायम तुच्छतेने वागवत इथल्या आदिवासींना कायम आपल्या हक्कापासून वंचित ठेवले आहे. पण आता नाही ! इथून पुढे छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते सध्या रायपूर (छत्तीसगड) दौऱ्यावर आहेत.
यावेळी त्यांनी इतर 6 सहकारी पक्षांसोबतची युती जाहीर केली आहे. जी छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व 90 जागा ताकदीने लढून इथल्या आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीच्या मुद्द्यावर आवाज उठवेल व आदिवासींना त्यांचे हक्क बहाल करण्यासाठी योगदान देईल. छत्तीसगडमध्ये ओबीसींची संख्या 48 टक्के, आदिवासी 32 टक्के, अनुसुचित जाती 16 टक्के आहे, तरी सुद्धा या समूहांची मोठी फसवणूक झाली आहे.
छत्तीसगडमध्ये समान विचारसरणीचे पक्ष आणि संघटना व सर्व आदिवासी समाज प्रमुख अरविंद नेताम, मागास समाज पार्टी युनायटेड अध्यक्ष गिरधर मधरिया, हमारा छत्तीसगड पक्षाचे अध्यक्ष लखन साहू, छत्तीसगड महतरी पार्टी व छत्तीसगडमधील इतर 6 समविचारी पक्षांचा समावेश आहे. या सर्वांचा उद्देश ओबीसी, आदिवासी, अनुसुचित जातींना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून दयायचे आहे. या युतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा आदिवासी असेल. अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटद्वारे केली आहे.