नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – विक्री व्यवसायात झटकन श्रीमंत होण्याच्या नादान अनेकदा भुरटे व्यापारी ग्राहकांची फसवणूक करतात. रोजच्या जेवणातील धान्यात भेसळ असो कि भाज्या, फळांची रंग देऊन विक्री असो. जाहिरातीच्या या युगात ऑनलाईन अनेक उत्पादने पाहायला मिळतात. टीव्ही मालिका असो व सिने सृष्टी यातील कलाकारांनी घातलेले कपडे, शूज अन आता तर गॉगल सारख्या गोष्टी देखील डुप्लिकेट स्वरुपात बाजारात विक्रीला येत आहेत .कमी किमतीतील ब्रँडेड कंपनीच्या वस्तू घेण्यासाठी तरून वर्ग चागलाच फसलेला दिसतो. अशीच घटना बीड येथे घडली.
ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली डुप्लिकेट गॉगल विकणाऱ्या व्यापाऱ्यावर बीडमध्ये बीड शहर पोलिसांनी कारवाई केली.बीड शहरातील काही दुकानात ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरून डुप्लिकेट गॉगल कमी किंमतीत विकले जात असल्याची माहिती संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती
.त्यानुसार त्यांनी बीड शहर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली. यानंतर पोलिसांनी बीड शहरातील काही दुकानांची तपासणी केली असता यातील एका दुकानात हे डुप्लिकेट गॉगल्स आढळून आले.याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.