महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी देश

‘सह्याद्री’ युद्धनौकेचा, पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय सागरी युद्ध सरावामध्‍ये सहभाग

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे मैत्रीपूर्ण वातावरण प्रस्थापित करून सहभाग नोंदवणे गरजेचे असते. त्यातून विविध क्षेत्रात आपली भागीदारी मजबूत करण्यास मदत होते. सागरी क्षेत्रात देखील भारताने विविध देशांशी शांतता व सुरक्षितता यासाठी सलोख्याचे संबंध निर्माण केले आहे. व त्या दिशेने पुढचे पाऊल म्हणून भारतीय नौदलाच्या हिंद प्रशांत क्षेत्रात तैनात असलेल्या स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सह्याद्री या युद्धनौकेने 20 – 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल (RAN) आणि इंडोनेशियन नौदल यांची जहाजे आणि विमानांसमवेत झालेल्या पहिल्या त्रिपक्षीय सागरी भागीदारी सरावात भाग घेतला.

या त्रिपक्षीय सरावाने तीन सागरी राष्ट्रांना त्यांची भागीदारी मजबूत करण्याची तसेच हिंद – प्रशांत क्षेत्राला स्थिर, शांततापूर्ण आणि सुरक्षित करण्यासाठी या देशांची सामूहिक क्षमता सुधारण्याची संधी दिली. या सरावाने सहभागी नौदलांना एकमेकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा लाभ घेण्याची संधीही उपलब्ध करून दिली. नौदलकर्मींच्या प्रशिक्षणासाठी आणि परस्पर समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने जटिल सामरिक आणि पावित्रात्मक कसरती, क्रॉस-डेक भेटी आणि हेलिकॉप्टरचे क्रॉस-डेक लँडिंग सारखे उपक्रम आयोजित केले गेले होते.

आयएनएस सह्याद्री हे स्वदेशी बनावटीचे आणि प्रोजेक्ट-17 क्लास मल्टीरोल स्टेल्थ फ्रिगेट्स अंतर्गत निर्मित तिसरे जहाज मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेड येथे बांधले गेले असून कॅप्टन राजन कपूर याचे नेतृत्व करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×