नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनात पातूर तालुका अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ यांच्या नेतृत्वात तालुकाभरातील गायरान धारक शेतकरी, अतिक्रमण धारक शेतकरी ई क्लास जमिनीवर राहणारे व एफ क्लास जमिनीवर राहणारे लोक यांच्या हक्क व अधिकारासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन वजा इशारा देण्यात आला की, गायरान जमीन धारक यांच्या जमिनी नियमाकुल कराव्यात अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी मोर्चामध्ये असंख्य गायरान जमीधारक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आजी-माजी जेष्ठ कार्यकर्ते वंचित युवा आघाडी, वंचित महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पातुर तहसीलला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. तालुका भरातील सर्व गायरान, जमीनधारक भल्यामोठ्या संख्येने पातुर तहसीलवर उपस्थित होते. सदर मोर्च्यामध्ये बाल,वृद्ध पक्षाचे झेंडे घेऊन मोर्च्यामध्ये सामील झाल्याने शहरात कुतूहलाचा विषय होता. प्रशासनाने गायरान जमिन धारकांच्या जमिनी नियमाकूल कराव्या अशी मागणी सर्व गायरान धारकांची यावेळी केली.